फक्त एक मिस कॉल
मिस कॉल बँकिंग ही मोफत सेवा आहे, ज्यामध्ये ग्राहक त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून फक्त मिस कॉल देऊन आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम, मिनी स्टेटमेंट आणि इतर अनेक बँकिंग सेवा मिळवू शकतात.
नोंदणी कशी करावी
ही सेवा वापरायची असेल तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून REG SPACE खाते क्रमांक 989898989898 या क्रमांकावर पाठवावा लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
या सेवा उपलब्ध
या मिस्ड कॉल सेवेचा वापर करून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक चेक, मिनी स्टेटमेंट, चेक बुक रिक्वेस्ट, चेक बुक प्राप्त, मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट, शैक्षणिक कर्ज व्याज प्रमाणपत्र, गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्र मिळवू शकता.
नोंदणी रद्द करा
यासाठी तुम्हाला 9898989898 वर मेसेज करायचा आहे. यानंतर तुमची नोंदणी रद्द झाली की नाही असा संदेश तुम्हाला मिळेल.