मा. श्री. उत्तम आनंदराव जाधव
- साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
- राधानगरी अर्बन निधी (बँक) लिमिटेड
- राधानगरी अर्बन फायनान्स सर्व्हिसेस प्रा. लि
- राधानगरी अर्बन फौंडेशन
- लोकमान्य करिअर अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज
ग्रामीण भागातील तरुणांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नोकरदारांना आर्थिक सहकार्याचा हात देण्यासाठी साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना केली आहे. असे म्हणतात की, देवापुढे जोडलेल्या दोन हातापेक्षाही मदतीसाठी पुढे केलेला सहकार्याचा एक हात अधिक पुण्यवान असतो. या भावनेतून समाजातील आर्थिक सबल माणसांची पुंजी गरजवंतांपर्यंत पोहचवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका घेऊन आम्ही कार्य करत आहोत. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीचे अनंत उपकार आमच्यावर आहेत त्या मातीतील माणसाला आधाराचा हात देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. सभासदांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. या विश्वासाला पात्र राहून स्वच्छ, पारदर्शक आणि गतिशील सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.
मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या मा. उत्तम जाधव यांनी बँकिंग व्यवस्थापन क्षेत्रातील ज्ञान व अनुभवाचा फायदा ग्रामीण भागासाठी व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन राधानगरी अर्बन निधीची (बँक) स्थापना केली. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू झालेली बँक अनेकांसाठी आर्थिक आधार बनली आहे. सर्व सहकार्यांच्या प्रयत्त्नाने आज राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या तालुक्यातील 25 हजार 'अ वर्ग' सभासद या परिवारात जोडले गेले आहेत. अभ्यासू , तंत्रज्ञानात पारंगत व भविष्याचा वेध असणाऱ्या मा. उत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री साईनाथ मल्टीस्टेट सोसायटीची वाटचाल सुरु आहे. समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय समोर ठेवून श्री साईनाथ मल्टीस्टेट सोसायटीची 2012 साली स्थापना झाली आहे. सक्षम नेतृत्व, विधायक दृष्टी व प्रामाणिक प्रयत्न या जोडीला आपला विश्वास असेल तर शाश्वत विकासाचे अपेक्षित ध्येय निश्चित साध्य होईल हा विश्वास वाटतो. त्यामुळे आपण सर्वांनी या परिवाराचा घटक म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावे व विकासाच्या प्रवासासाठी साथीदार बनावे हीच अपेक्षा.